मुंबई, दि. 8 : स्वच्छ
भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियानामध्ये लोकसहभाग वाढावा, नवनवीन
कल्पनांचा वापर या अभियानात व्हावा, या उद्देशाने देशातील
पहिली स्वच्छथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. नवी दिल्ली येथे 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी उपांत्य आणि अंतिम फेरी पार
पडली, या स्पर्धेत ‘महाराष्ट्राच्या
स्वच्छ रेडिओ’ उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर दुसरे पारितोषिक
मिळाले. याबद्दल पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी
महाराष्ट्राच्या स्वच्छ महाराष्ट्र रेडिओ टिमचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राला विविध प्रकारात एकूण
तीन पारितोषिके केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री एस.एस.अहलुवालिया, रमेश चंदप्पा, जिगाजीनागी यांच्या
हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय सचिव परमेश्वरन अय्यर, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल
आदी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानात राबवित असलेल्या विविध उपक्रम, कार्यक्रमाची माहिती देणारे दररोज दीड मिनिटाचे बातमीपत्र
व्हॉट्स ॲप ग्रुपद्वारे देण्यात येते. यास ‘स्वच्छ महाराष्ट्र
रेडिओ’ असे नाव देण्यात आले आहे. जवळपास एक हजार ग्रुपवर हे
बातमीपत्र पाठविले जाते. या उपक्रमास राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय पारितोषिक
प्राप्त झाले आहे.
या कामासाठी विशिष्ट टिम नेमण्यात आली आहे. या उपक्रमात नांदेडचे संवादक
मिलिंद व्यवहारे यांनी अथक परिश्रम घेतले. मंत्री श्री. लोणीकर, अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांचे प्रोत्साहन या
उपक्रमास मिळाले. तसेच उपसचिव रुचेश जयवंशी, संचालक डॉ. सतीश
उमरीकर, युनिसेफ मुंबईचे मार्गदर्शक युसूफ कबीर, जयंत देशपांडे हे सुरवातीपासून सहभाग आणि सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे.
राज्यातील सर्व संवाद सल्लागार यांची सातत्याने मदत होत आहे म्हणूनच हा प्रवास
इथपर्यंत होऊ शकला, राज्यातील सर्व यंत्रणेचे घटक यांचे सुद्धा
अप्रत्यक्ष सहकार्य लाभले आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद व्यवहारे यांनी दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment