Thursday, 7 September 2017

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संदर्भात स्वतंत्र कायदा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा - चंद्रकांत पाटील

            मुंबईदि. 7 : कोल्हापूरमधील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात स्वतंत्र कायदा तयार करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. देवस्थान समितीच्या जमिनी रेडीरेकनर दराने कुळांना विकण्यास प्राधान्य देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज येथे सांगितले. तसेच पुजारी नियुक्तीसंदर्भात नेमलेल्या समितीने तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
            विधीमंडळात दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांचा नेमणुकीचा प्रश्नदेवस्थान समितीच्या ताब्यातील जमिनी आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागरविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादारपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,सचिव विजय पवार आदी यावेळी उपस्थित होते.
            पश्चिम महाराष्ट्र देवस्थान संस्थानच्या जमिनी पूर्वापार कुळांना कसण्यास दिल्या आहेत. अशा सुमारे २६ हजार हेक्टर जमिनी असून या जमिनींचे लेखा परिक्षण करून त्यांचे विनियोजन करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार असून या जमिनी रेडिरेकनर दराने विकण्यासाठी या कुळांना प्राधान्य देण्यासंदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महसूल मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
  श्री अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी व वारसा हक्क मिळालेले पुजारी यांच्यात समन्वय रहावायासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच यासंदर्भात व मंदिरातून दान रुपात मिळणाऱ्या निधीच्या विनियोगासंदर्भात येत्या विधीमंडळ अधिवेशनापर्यंत स्वतंत्र सर्वसमावेश कायदा करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.

No comments:

Post a Comment