Monday, 25 September 2017

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवरांची आदराजंली




 नवी दिल्लीदि.25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडेआदिवासी विकास मंत्री विष्णु सवरावैद्यकीय शिक्षण व जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजनकृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरसामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोलेउद्योग आणि खनिकर्मपर्यावरण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटीलऊर्जापर्यटनअन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह सर्वश्री आमदार शिवाजीराव कर्डिलेनारायण कुचेहरीभाऊ जावळेआर.टी. देशमुखपास्कल धनारेॲड. संजय धोत्रेराजेंद्र पाटणीबंटी भांगडीयासुरेश भोळेडॉ. मिलिंद मानेसंजय पवारसेल्वन कॅप्ट.आर. तमिलचंदूभाई पटेल,गिरीश व्यास आदींनी पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्लागुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रअपर निवासी आयुक्त समीर सहायमहाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सह अन्य अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होतेयांनीही यावेळी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.
                                                         *****

No comments:

Post a Comment