नागपूर, दि. 9 : ऑक्टोबर महिन्यातील महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे सोमवार दि. 16ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजीत करण्यात आला आहे.
राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधीचा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अर्ज विहीत नमुन्या असावा, तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. याप्रकारे लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष असून न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसणारे अर्ज स्विकारण्यात येणार नसल्याचे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment