Monday, 9 October 2017

विभागीय लोकशाही दिनात एक तक्रार प्राप्त

नागपूर, दि. 9 :  अपर आयुक्त आर. एस. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 1 तक्रार  स्वीकारण्यात आली.  प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर-1 अशा एका तक्रारीचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. यावेळी नवीन चार प्रकरणात चर्चा झाली. तसेच जुन्या 2 तक्रारींवर  सुनावणी  घेण्यात आली.
या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षकनागपूर परीक्षेत्रनागपूर, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुख्य कार्यपालन अधिकारीजिल्हा परिषद,नागपूर तसेच  इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment