· पत्रकारांसाठी पुरस्कार योजना
· जिल्हास्तर 31 हजार रुपयाचा जलमित्र पुरस्कार
· विभागस्तर राजमाता जिजाऊ 50 हजारचा जलमित्र पुरस्कार
· राज्यस्तर महात्मा ज्योतिबा फुले 1 लक्ष रुपये जलमित्र पुरस्कार
नागपूर, दि.10 :- जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांसाठी
जलयुक्त शिवार जलमित्र पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान या
विषयावर लिखान केलेल्या बातमीदारांनी 20 ऑक्टोबर पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर प्रथम- 31 हजार, द्वितीय- 21 हजार, तृतीय- 15 हजार रुपयांच्या पुण्यश्र्लोक
अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने तसेच विभागीय स्तरावर प्रथम-50 हजार, द्वितीय- 35
हजार, तृतीय- 25 हजार रुपयांच्या राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्काराने तर राज्यस्तरावर प्रथम- 1
लक्ष, द्वितीय- 71 हजार व तृतीय- 51 हजार रुपयांच्या महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराने
सन्मानीत करण्यात येईल. बातमीदारांनी प्रवेशिका संपादकाच्या शिफारसीने पाठवाव्यात.
जलयुक्त शिवार पुरस्कार जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर देण्यात येत असून यासाठी 1
जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत या कालावधीतील लिखान ग्राहय धरण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी प्रवेशिकेसोबत संपादकाच्या शिफारशीसह मुळ कात्रणे व दोन झेरॉक्स प्रती जोडणे
आवश्यक आहे.
लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणारे पत्रकार
आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग
वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना
प्रोस्ताहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणारे व बातम्यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार
अभियानाला प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांना जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी
तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रवेशिका पाठवितांना बातम्या, लेख हे 1 जोनवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत
प्रकाशित झालेले असावेत. प्रवेशिका तीन प्रतीत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती
कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक 1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे 20 ऑक्टोबर
2017 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment