Thursday, 14 December 2017

मतिमंद मुलांच्या वसतिगृहात प्रती विद्यार्थी 2 हजार रुपयांचे परिपोषण अनुदान देण्यास मान्यता -सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

            नागपूर, दि. 13 : राज्यातील मतिमंद मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये दराने परिपोषण अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
            मतिमंद मुलांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या अनुदानाची रक्कम वाढविण्याबाबत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, किसन कथोरे, संदीप नाईक आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री यांनी म्हटले आहे की, महिला व बालविकास विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरीत झालेल्या अनुदानित मतिमंद बालगृहे सलग्न शाळा या 14 संस्थांमधील प्रवेशितांना परिपोषण अनुदान सुधारित करण्याबाबत समिती कठीत करण्यात आली आहे. त्याचा निर्णय होईपर्यंत एप्रिल 2017 पासून प्रतिमाह, प्रति प्रवेशित 2 हजार रुपये दराने परिपोषण अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
000

No comments:

Post a Comment