Thursday, 14 December 2017

अमरावती जिल्ह्यातील 38 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीन अनुदानाची रक्कम जमा -पणन मंत्री सुभाष देशमुख

            नागपूरदि. 13 : अमरावती जिल्ह्यातील 38,791 लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानापोटी 12 कोटी 16 लाख 97 हजार 520 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
            सदस्य सर्वश्री विरेंद्र जगताप व ॲड श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन अनुदानाची रक्कम थकीत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना पणन मंत्र्यांनी म्हटले आहे की, हंगाम 2016-17 मध्ये अनुकुल हवामान व समाधानकारक पावसामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली होती. बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले होते. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी 200 रु. प्र.क्विंटल व कमाल 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अमरावतीतील जिल्ह्यातील 38,791 पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
000

No comments:

Post a Comment