Tuesday, 5 December 2017

'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य' 'दिलखुलास’ कार्यक्रमातज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची मुलाखत


मुंबई, दि.5 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य' या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि. 6  आणि गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017  रोजी सकाळी  7.25  ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी घेतली आहे.
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणाचे धुरीण, एक व्यासंगी पत्रकार, कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये, शेतक-यांच्या प्रश्नासाठी जागरूक ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याची  सविस्तर माहिती  ज्येष्‍ठ साहित्यिक पतंगे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

००००

No comments:

Post a Comment