मुंबई दि. 5 : महाराष्ट्र
शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा
निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व
औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी विहित
नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित
विभागीय कार्यालयांकडे दि. 30 डिसेंबर 2017 पर्यंत
पोहोचणे आवश्यक आहे.
मुंबई व
कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा
संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी
क्र.022-27573542 येथे
पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा
संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी
क्र. 020-26121709 येथे करता
येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा
संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल
लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर
औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा
संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी
क्र. 0240-2361372 येथे अर्ज
करता येतील.
हिंदी भाषा
निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित
विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 022-
26552184
वर संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
००००
No comments:
Post a Comment