Thursday, 21 December 2017

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची ‘सुयोग’ला भेट


नागपूर, दि. 21 : महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सुयोग पत्रकार निवासाला भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
आमदार राज पुरोहित हेही यावेळी उपस्थित होते.  महिला व बालविकासतसेच ग्रामविकास विभागाच्या योजनानवे निर्णय याबाबत श्रीमती मुंडे यांनी यावेळी माहिती दिली. त्या म्हणाल्या की महिला ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांसाठी बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्जवितरण करण्याचा निर्णय घेतला. मनोधैर्य योजनेत  अर्थसहाय्य रक्कम ३ लाख रुपयांहून १० लाख रुपयांवर वाढवली. बचत गटांची चळवळ दृढ केली. विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन 5 रुपयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी राजकीयसामाजिक चळवळी आदी विविध विषयांवर चर्चा झाली.

*****

No comments:

Post a Comment