Tuesday, 5 December 2017

ग्रंथोत्सवातील लोकराज्य दालनाचे ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांच्या हस्ते उद्घाटन

        नागपूर, दि. 5 :  ग्रंथोत्सवानिमित्त डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन झाले. ग्रंथ प्रदर्शनामध्ये जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लोकराज्य प्रदर्शन व विक्रीच्या दालनाला ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती आशा बगे यांनी भेट देऊन ग्रंथदालनाचे उद्घाटन केले. विविध प्रकाशकांनी या ग्रंथ प्रदर्शनीत सहभाग घेतला.
            माहिती व जनसंपर्क विभागातर्फे महाराष्ट्राच्या सर्वागिंण माहिती असलेली महाराष्ट्र वार्षिकी 2017 हा ग्रंथ श्रीमती आशा बगे यांना जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी भेट देऊन स्वागत केले. ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांनी शासकीय ग्रंथालयाच्या ग्रंथदालनास तसेच विविध प्रकाशकांच्या दालनास भेट देऊन ग्रंथांची माहिती घेतली. यावेळी जिल्हा ग्रंथपाल एम.जी. कुरवाडे, माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर आदी उपस्थित होते.
            लोकराज्य या मासिकाबद्दल बोलतांना श्रीमती आशा बगे म्हणाल्या की, लोकराज्य अंक हा अत्यंत सुबक आणि तेवढाच आकर्षक असून अत्यंत माहितीपूर्ण आहे. महाराष्ट्रातील विविध विषया संदर्भात या अंकात अभ्यासपूर्ण माहिती वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येते. हा अंक संग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र वार्षिकी हा संदर्भ ग्रंथ शासनातर्फे प्रकाशित केल्याबद्दल आनंद व्यक्त करतांना त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक तसेच विविध विभागातील प्रगतीचा आलेख अत्यंत सुबकपणे मांडला असून प्रत्येक जिल्ह्याची माहिती संदर्भासाठी उपयुक्त आहे.
                                                                        ** * * * **

No comments:

Post a Comment