Wednesday, 6 December 2017

जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या संकुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

            मुंबई, दि. 6 :जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालयीन व निवासी संकुल उभारण्याचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना ‍जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिल्या.
            राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालयीन व निवासी संकुल उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री.लोणीकर बोलत होते.
            राज्य राखील पोलीस दलाचे कार्यालयीन व निवासी सुनियोजित संकुल उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे महत्वाचे आहे. या कामासाठी लागणारी साधन सामुग्री स्थानिक स्थरावर उपलब्ध आहे. त्या माध्यमातून या संकुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे.
            या संकुलात एकूण 29 इमारती आहेत. सर्वांचे ले आऊट व इतर कामाचे नियोजन झाले असल्याचे अधिक्षक अभियंना यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे मुख्य अभियंता श्री.देखाते, अधिक्षक अभियंता अ.आ.खोत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment