Wednesday, 6 December 2017

आयकर बचतीचे दस्ताऐवज तात्काळ सादर करा

नागपूर, दि. 6 :   निवृत्तीवेतन धारकांच्या मासिक निवृत्तीवेतनामधून माहे नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत देय आयकराची कपात  करण्यात येणार आहे. याकरीता आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांनी आयकर बचतीचे दस्ताऐवज तात्काळ सादर करुन नियमानुसार सुट प्राप्त करावी.
आर्थिक वर्ष 2017-2018 मधे आयकर मर्यादेपेक्षा जास्त  निवृत्तीवेतन असलेल्या निवृत्तीवेतनधारकांचे आयकर नियम 192 अंतर्गत आयकर कपात करण्यात येणार आहे.आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांनी 2017-2018 या वर्षामध्ये अदा केलेल्या व पुढील कालावधीत देय असलेल्या निवृत्तीवेतनाची नियमानुसार परिगणना करुन नोव्हेंबर 2017 पासून आयकर कपात सुरु करण्यात आली आहे. असे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

No comments:

Post a Comment