Wednesday, 6 December 2017

मुंबई महापालिकेच्या ॲप, संकेतस्थळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ


देशातील पहिलाच प्रयोग; विविध सुविधा एका क्लीकवर

मुंबई़,दि. :मुंबई महापालिकेच्याॲपआणि संकेतस्थळामुळे नागरिकांसाठीच्या महत्त्वपुर्ण अशासेवा कार्यक्षम आणि पारदर्शकपणे उपलब्धहोणारआहेत. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे अद्ययावत तंत्रज्ज्ञानाचा सेवाक्षेत्रात वापरकरण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न अभिनंदनीय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुंबईमहापालिकेच्या MCGM 24 x 7 यामोबाईलॲपचातसेचआणि One MCGM GIS  या संकेतस्थळाचा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगरविकासविभागाचे प्रधानसचिव नितीनकरीर, महापालिकेच्या बांधकामविभागाचे प्रमुख अभियंता संजयदराडे, एमसीएचआय, क्रेडाई, नरेडको आणि पीईएटीए या बांधकामव्यवसायाशी संबंधितसंघटनांचे प्रतिनीधी आदीची उपस्थितहोती.
मुख्यमंत्रीम्हणाले, नागरिकांसाठीच्या प्राधान्यसेवाक्षेत्रात अद्ययावत डिजिटायझेशन आणि तंत्रज्ज्ञानाचा वापर करून घेण्याचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे. याक्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने याबाबी महत्त्वाच्या आहेत. याॲपआणि संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांसाठी चांगल्या सेवा देता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या रेरा याकायद्यालाहीउच्चन्यायालयाने योग्य ठरविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नालाही बळ मिळाले आहे. त्या अनुषंगानेही मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या सेवा समयोचित ठरल्याआहेत. यासाठीदेशातपहिल्यांदाचअशाप्रकारचेॲपआणिसंकेतस्थळसुरुकेल्याबद्दलमुख्यमंत्र्यांनीआयुक्तांसह, या प्रणालींच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध घटकांचेही अभिनंदनकेले.
सुरवातीला आयुक्त मेहता यांनी संकेतस्थळ व ॲपच्या वैशिष्ट्यांबाबत तपशीलवार माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्लीकद्वारे संकेतस्थळ व ॲपचा प्रारंभ करण्यात आला.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरी सेवा सुविधांची गरज लक्षात घेऊन विकास नियोजन आराखड्यानुसार भूखंडांचे आरक्षण (DP Reservation) केले जात असते. यानुसार एखाद्या भूखंडावर नक्की कोणते आरक्षण आहे, हे तात्काळ बघता यावे यासाठी महापालिकेच्या ''MCGM 24X7'' या मोबाईल ॲपमध्येच विशेष अत्याधुनिक सुविधा आजपासून सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा 'जीआयएस' आधारित असल्यामुळे ज्या ठिकाणी व्यक्ती असेल, त्या ठिकाणच्या भूखंडावर नक्की कोणते आरक्षण आहे, हे क्षणार्धात बघणे आता शक्य झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार या प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देणारे हे देशातील याप्रकारचे पहिलेच ॲप आहे.

त्याचबरोबर अधिक गतिशील व पारदर्शक प्रशासनासाठी महापालिकेने अंतर्गत स्तरावर 'One MCGM GIS' हे संयुक्त संकेतस्थळ (Portal) देखील आजपासूनच सुरु केले आहे. या संकेतस्थळामुळे महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये तसेच संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे आता अधिक वेगवान होणार आहे.



मोबाईल ॲप सुविधा व संयुक्त संकेतस्थळ याची ठळक वैशिष्ट्ये :
·  महापालिकेच्या 'MCGM 24X7' या मोबाईल ऍपमध्ये विकास नियोजन आराखड्यानुसार असणारी भूखंडावरील आरक्षणे बघण्याची सुविधा आता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे १९९१ चा विकास आराखडाआणि २०३४ चा प्रारुप विकास आराखडा, या दोन्ही आराखड्यांनुसार एखाद्या भूखंडावर असणारे आरक्षण एन्ड्रॉईड व आयओएस मोबाईलच्या आधारे बघता येणार आहे.
·  डीपी आरक्षण बघण्याची ही सुविधा 'जीआयएस' आधारित असल्याने एखादी व्यक्ती मोबाईल हातात घेऊन ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणच्या भूखंडावर नक्की कोणते आरक्षण आहे, हे या ऍपद्वारे तात्काळ बघता येणार आहे.मात्र, यासाठी आपल्या मोबाईलमधील 'लोकेशन' पर्याय सुरु असणे आवश्यक आहे.
·  'One MCGM GIS' या पोर्टलवर महापालिकेच्या विविध खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. या पोर्टलवरील माहिती प्रामुख्याने महापालिका अधिकारी व कर्मचा-यांना उपलब्ध असणार आहे.
·  या पोर्टलद्वारे महापालिकेच्या विविध खात्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन प्रशासकीय निर्णय प्रक्रिया व समन्वयन अधिक वेगवान होणार आहे.
·  या पोर्टलवर सध्या विकास नियोजन (DP), पर्जन्यजल वाहिन्या (SWD), मालमत्ता कर (Property Tax),शिक्षण, उद्यान, मलनिःसारणप्रचालने (SO), आपत्कालीन व्यवस्थापन, मालमत्ता (Estate), जल अभियंता(HE), रस्ते व वाहतूक इत्यादी खात्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे सुसमन्वयन साधले जाऊन प्रशासकीय निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.
·  उदाहरणार्थ, एखाद्या रस्त्याचे काम करावयाचे असल्यास या पोर्टलवरील नकाशात संबंधित रस्ता 'सिलेक्ट' केल्यास त्या रस्त्याचे पूर्वी झालेले काम, दोषदायित्व कालावधी (DLP), रस्त्याच्या खालून गेलेले विविध उपयोगितांचे जाळे(Utility Network) इत्यादींची माहिती एकत्रित पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
·  वरीलनुसार सदर रस्त्याशी संबंधित सर्व बाबींचे समन्वयन करण्यासोबतच संबंधित उपयोगितांना देखील रस्त्याचा खोदकाम कालावधी कळविता येणार आहे. ज्यामुळे विविध उपयोगितांशी संबंधित कंपन्यांना देखील त्याच कालावधीत त्यांचे काम करुन घेता येणार आहे. परिणामी रस्ते खोदण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
००००



No comments:

Post a Comment