नागपूर, दि. 13 : परतवाडा जिल्हा अमरावती येथे आदिवासी वसतिगृह बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाला एकत्रित वास्तूमांडणी आराखडा सादर करण्याबाबत आदिवासी विभागाला कळविण्यात आले आहे. आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने मंजूरी दिली जाईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य बच्चू कडू यांनी परतवाडा ता. अचलपूर येथे आदिवासी वसतिगृह बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केले होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, आदिवासी विभागाकडून वसतिगृह मागणीचा प्रस्ताव सादर करणे तसेच सामाजिक न्याय व आदिवासी विभाग या दोन्ही वसतिगृहांच्या एकत्रित वास्तूमांडणी आराखडा सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तो प्राप्त होताच त्याचे अवलोकन करुन जागा हस्तांतरीत करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
000
No comments:
Post a Comment