Thursday, 14 December 2017

बदलत्या महाराष्ट्राचे उत्कृष्ट छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शन - डॉ. के. व्यंकटेशम

v  महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाला भेट

नागपूरदि.14 :  महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक पंरपरा तसेच लोकजीवन छायाचित्राच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्र माझा या राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी आज महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या माध्यमातून बदलत्या महाराष्ट्राचे उत्कृष्ट दर्शन होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.
शासकीय मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात (अजब बंगल्यात) माहिती व जनसंपर्क विभागातर्फे महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राज्यातील छायाचित्रकारांनी काढलेल्या उत्कृष्ट व निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहे.
यावेळी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, विशेष शाखेचे उपायुक्त निलेश भरणे, बी.जी.गायकर, श्वेता खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र माझा या राज्यस्तरीय स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त छायाचित्रासह महिला सक्षमीकरणा संदर्भातील छायाचित्रकारांनी काढलेल्या निवडक छायाचित्रांबद्दल विशेष कौतुक करताना पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी बैलगाडीत स्पर्धेत महिलांनी घेतलेला सहभाग, सावित्रीच्या लेकी, बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन तसेच सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणाऱ्या विविध छायाचित्रांबद्दल त्यांनी विशेष दाद दिली.
प्रारंभी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाचा आयोजनाबद्दलची माहिती दिली.
महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत
            महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व अभ्यागत मोठ्या प्रमाणात भेट देत असून छायाचित्र प्रदर्शन सर्वांना बघता यावे यासाठी हे प्रदर्शन 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
            महाराष्ट्र माझा हे छायाचित्र प्रदर्शन विनामूल्य 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असून शासकीय मध्यवर्ती संग्रहालयातील कलादालनात असलेल्या या प्रदर्शनासाठी अभ्यागतांनी माध्यमिक शिक्षण मंडळासमोरुन गुप्ता हाऊस शेजारील रस्त्याने (अन्न धान्य वितरण कार्यालय) जवळील मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात भेट देता येईल. हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विनामूल्य सर्वांसाठी खुले आहे.
                                                    ** * * * **

No comments:

Post a Comment