·
बालकांसाठी इंद्रधनुष लसीकरण
मोहिम
नागपूर , दि. 13 : देशातील
प्रत्येक बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि
कुटुंब कल्याण विभागातर्फे मिशन इंद्रधनुष कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहिम
राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील
एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी मिशन इंद्रधनुष मोहिम
प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप
व्यास यांनी दिल्या.
राज्यातील 10 जिल्ह्यांतील
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी
यांच्या सोबत येथील उपसंचालक, आरोग्य विभागाच्या कार्यालयातील व्हिडीओ
कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मिशन इंद्रधनुषचा आढावा श्री. व्यास यांनी घेतला. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीव कुमार,
अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक सतिश पवार, सहसंचालक शशिकांत जाधव,
रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. व्यास म्हणाले, राज्यातील
2 वर्षांखालील बालक व गरोदरमातांचे सात प्रकारच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी
आरोग्य विभागातर्फे मिशन इंद्रधनुष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत
राज्यातील 10 जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहिम सुरु आहे. दर
महिन्यात नियमितपणे अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य केंद्राव्दारे प्रत्येक
बालकांना लस दिली जाते. या जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस,
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांनी आपल्या भागातील लसीकरणापासून वंचित असलेल्या
बालकांचा शोध घेवून लसीकरण करावे. प्रामुख्याने वंचित वस्ती, तांडे, ऊस तोडणी
कामगार, बांधकाम कामगार, वीट भट्टी, ओसाड वस्त्यांमधील बालक व गरोदरमातांचे लसीकरण
करावे, जेणेकरुन माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल.
यावेळी श्री. व्यास यांनी संपूर्ण
राज्याचा जिल्हानिहाय लसीकरण करण्यात आलेल्या क्षेत्रांचा आढावा घेतला. बालक आजारी
आहे म्हणून किंवा लसीकरण टाळणाऱ्या पालकांना मिशन संदर्भात मार्गदर्शन करावे. मिशन
अंतर्गत दर महिन्याला दि. 7 ते 15 तारखेपर्यंत बालकांचे व मातांचे नियमित लसीकरण
करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य आयुक्त संजीव कुमार यांनी
सादरीकरणातून लसीकरण मोहिमेची माहिती दिली. एप्रिल 2015 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत
मिशन इंद्रधनुषतून 84 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. डिसेंबर 2018 पर्यंत सर्व जिल्हयानी मिशन
इंद्रधनुष प्रभावीपणे राबवावे, यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, परिचारिका
यांची मदत घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे
वेतन नियमित करण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी डॉ. अर्चना पाटील यांनी
व्हीडिओ कॉन्फरसिंग मध्ये सहभागी अधिकाऱ्यांना सर्व बाबींवर मुद्देसूद मार्गदर्शन
केले.
No comments:
Post a Comment