माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी, संपूर्ण भारतात ध्वज दिन निधी गोळा केला जातो. या ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
भारत मातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे याकरिता तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक, उद्योगपती, शालेय विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सदर कार्यास हातभार लावतात. त्यामुळेच नुकत्याच संपलेल्या ध्वजदिन निधी वर्ष 2016 मध्ये सुमारे 32 कोटी रुपये जमा झाले असून, ध्वजदिन निधी 2017 साठी रुपये 35 कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मी स्वत: या निधीस मानधनातून प्रत्येकी रु 51,000/- दिलेले आहेत. या निधीस विधान परिषद सदस्यांनी देखील आपल्या मानधनातून सढळ हाताने बहुमूल्य मदत करावी, असे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले.
००००

No comments:
Post a Comment