Thursday, 21 December 2017

बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरु - शिक्षणमंत्री विनोद तावडे

नागपूर दि. 21 : बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरु, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य अमरसिंह पंडित यांनी उर्दू शिक्षकांची पदे भरण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री. तावडे पुढे म्हणाले, सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात उर्दू माध्यमाच्या इयत्ता 11वी व 12वीमध्ये एकूण 79 विद्यार्थी शिकत आहे. मौजे तलवाडा येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेस शासन मान्यता असून तेथे उर्दू शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सतिश चव्हाण, श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.
००००
नियमबाह्यरित्या शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी चौकशी करणार
- शिक्षण मंत्री विनोद तावडे
नागपूर, दि. 21 : राज्यातील नियमबाह्यरित्या शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
राज्यात प्राथमिक विभागात 796, माध्यमिक 4 हजार 570 आणि उच्च माध्यमिक विभागात 1 हजार 550 शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न सदस्य नागोराव गाणार यांनी विचारला. या प्रश्नाच्या उत्तरार्थ श्री. तावडे म्हणाले, शासनाने ऑगस्ट 2015 मध्ये वैयक्तीक मान्यता तपासणी समिती गठित करुन मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, हेमंत टकले, कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.
००००
विनाअनुदानित शाळेच्या मूल्यांकनाकरिता
लवकरच आदेश
- शिक्षण मंत्री विनोद तावडे
नागपूर, दि. 21 : विनाअनुदानित शाळेच्या मूल्यांकनाकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे शाळेच्या मूल्यांकनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक संस्थांना शेवटच्या वर्गाच्या पटात 30 ऐवजी 20 पट करुन त्याबाबत नवीन शासन आदेश निर्गमित करण्याचे निर्देश शासनाला दिलेले आहेत, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
००००
लासलगाव विंचूरसह 16 गावांच्या पाणीपुरवठा
योजनेसाठी सौरऊर्जा संयंत्र मंजूर होणार
-         पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर
नागपूर, दि. 21 : लासलगाव विंचूरसह (जि. नाशिक) 16 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सौर ऊर्जा संयंत्र मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले जातील, असे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयवंतराव जाधव यांनी सौर ऊर्जा पथदर्शी प्रकल्पाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री. लोणीकर म्हणाले, ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी योजना विजेअभावी बंद आहेत. तेथे सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत शासन विचार करीत आहे. लासलगाव विंचूरच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची नाविन्यपूर्ण योजना म्हणून शासनस्तरावर दखल घेतली जाईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री. हेमंत टकले यांनी भाग घेतला.
००००
नगरपरिषदेच्या शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ
देण्याबाबत लवकरच निर्णय
- शिक्षण मंत्री विनोद तावडे
नागपूर, दि. 21 : नगरपरिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना शासनाच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
नगरपरिषदेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रा. अनिल सोले, विक्रम काळे यांनी विचारला होता.
००००
खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी
विधेयक मसुदा समिती स्थापन
-         शिक्षणमंत्री विनोद तावडे
नागपूर, दि. 21 : राज्यातील अनधिकृतरित्या चालविण्यात येणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन केली असून विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे सदस्य नागोराव गाणार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा अंमलात आणणार असून त्याअनुषंगाने विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमार्फत करण्यात येत आहे, असे श्री. तावडे यांनी पुढे सांगितले.
००००
विधानपरिषद लक्षवेधी :
नरभक्षक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर
यवतमाळमधील वाघिणीस ठार मारण्याचे आदेश देऊ
                                - सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार
नागपूर, दि. 21: वाघाच्या हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील काही शेतकरी व पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाघास जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून कार्यवाही सुरू असून ही वाघीण नरभक्षक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाघिणीस ठार करण्याचे आदेश दिले जातील, असे सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत सांगितले.
            सदस्य श्री हरीसिंग राठोड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या वाघाची ओळख पटविण्यासाठी प्राप्त डी.एन.ए. नमुने विश्लेषणासाठी सेंटर फॉर सेल्यूलर ॲण्ड मॉलेक्युलर बायॉलॉजी, हैद्राबाद तसेच नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, बंगलुरू या संस्थेकडे पाठविण्यात आले होते.
            त्यानुसार या उपद्रवी वाघिणीची ओळख पटवून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी या वाघिणीस पिंजराबंद करण्यास तसेच नियमानुसार बेशुद्ध करुन बंदिस्त करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादे.), यवतमाळ यांना प्राधिकृत करण्यात आले. मात्र यासाठी काही मर्यादा असल्याने या वाघिणीची लाळ तपासणी करण्यात आली असून याच वाघिणीने शेतकरी व जनावरांना ठार केले आहे हे सिद्ध केले आहे. हा अहवाल वनविभागास पाठविण्यात आला असून ही वाघीण नरभक्षक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघिणीला ठार मारण्याच्या सूचना दिल्या जातील.
            जंगली प्राणी जंगलातून मानवी वसाहतीमध्ये येऊ नयेत यासाठी यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून जंगलाच्या कडेला सलग चर (ट्रेंन्चिंग) करण्याची नाविण्यपूर्ण योजना हाती घेतली आहे, अशी माहिती देखील श्री. येरावार यांनी यावेळी दिली.
0000
मानखुर्द येथील प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कंपनीची मान्यता रद्द करणार
- पर्यावरण मंत्री रामदास कदम
            नागपूरदि. 21 : मानखुर्द शिवाजी नगर मुंबई उत्तर पूर्व विभागातील एसएमएस इन्होक्लीन या कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत तपासणीसाठी अधिकाऱ्यांना पाठवून कंपनीची तपासणी करण्यात येईल. यामध्ये तथ्य आढळून आल्यास कंपनीची मान्यता रद्द करण्यात येईलअशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली.
            सदस्य अबू आझमी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना श्री.कदम म्हणाले कीया कंपनीची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अहवालामध्ये तथ्य आढळून आल्यास कंपनीची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
0000
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण तयार करणार
- सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
            नागपूरदि.21 : अन्य राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या धोरणाचा अभ्यास करुन राज्याचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईलअशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या सूचनेच्या उत्तरात दिली.
            सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर बोलताना श्री.बडोले म्हणाले कीज्येष्ठ नागरिक धोरण 30 सप्टेंबर 2013 रोजी करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून गंभीर आजाराबाबत धर्मदाय संस्था व राज्य शासनाकडून मदत करण्यात येते. तसेच शासकीय रुग्णालय व बस प्रवासाकरिता सवलत देण्यात येते.
            अन्य राज्यातील धोरणाचा अभ्यास करुन राज्याचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याकरिता या धोरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी व इतर संबंधीत घटकांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
            केंद्राप्रमाणे राज्यातही ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्यात याव्यात तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वरुन 60 करण्यात यावे याबाबत शासन सकारात्मक असल्याचे श्री.बडोले यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत कार्यवाही चालू असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
            विधवा व दिव्यांग महिला यांचा मुलगा 25 वर्षाचा झाला असेल तर त्याची पेन्शन बंद केली जाईल. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वर्षभर मानधन थकीत असेल तर संबंधित तहसिलदारावर कार्यवाही केली जाईल. संलग्न खाते असलेल्या लाभार्थ्यांना 1200 रुपये दिले जाणार आहेत.
            या चर्चेत सदस्य सर्वश्री चंद्रदीप नरकेविजय काळेहसन मुश्रीफअब्दुल सत्तारसमीर कुणावारविजय वडेट्टिवारजयंत पाटीलअतुल भातखळकरश्रीमती मनिषा चौधरीभारती लव्हेकर  आदींनी सहभाग घेतला होता.
000

 
रणजीच्या अंतिम फेरीत धडक
विदर्भ क्रिकेट संघाचे
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
 
नागपूरदि. 21 : रणजी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारलेल्या विदर्भाच्या क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून दिल्लीविरूद्धच्या अंतिम लढतीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आठवेळा रणजी विजेत्या कर्नाटकचा उपांत्य सामन्यात पराभव करणे ही कौतुकाची बाब असून लहान शहरातील खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश असलेल्या विदर्भाच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत केलेली कामगिरी प्रशंसनीय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
००००

 
विधानसभा इतर कामकाज लक्षवेधी :
मराठा समाजाच्या आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक
मागास आयोगाला अहवाल 31 मार्च पर्यंत देण्याबाबत विनंती करणार
- चंद्रकांत पाटील
            नागपूरदि. 21 : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतच्या मागणीच्या संदर्भात शासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरु केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मागास आयोगाची स्थापना केली असून त्यांचा अहवाल 31 मार्च पर्यंत देण्याबाबत विनंती करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
            मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तसेच त्यांना शैक्षणिक सवलती देण्याबाबत आणि पूर्वीच्या शासनाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षणाच्या अंतर्गत शासकीय नौकरीत लागलेल्या तरुणांच्या नौकऱ्यांचे संरक्षण करण्याच्या अनुषंगाने विधानसभा सदस्य प्रकाश आंबिटकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
            या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना श्री.पाटील पुढे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्याबात शासन सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षणाची बाब न्यायलयाच्या कार्यकक्षेत आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाची मागणीच्या अनुषंगाने मागास आयोगची शिफारस आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने मागास आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाला त्यांचे कामकाज करणे सोयीचे व्हावे. यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुवीधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. हा आयोग स्वायत्त असल्याने आयोगाला आपला अहवाल 31 मार्चपर्यंत द्यावा अशी विनंती करण्यात येईल. शासनाने या पूर्वीच मराठा समाजाच्या तरुण तरुणीला विविध शैक्षणिक सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापूर्वी शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेवून जे तरुण तरुणींना शासकीय नौकरी मिळाली आहे. परंतु मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांच्या नौकऱ्या जाऊ नयेत्यांच्या नौकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे. या तरुणांना खुल्या वर्गात समाविष्ट करुन घेण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून घेण्यात येतीलअसेही श्री.पाटील यांनी सांगितले.
            प्रत्येक जिल्ह्यच्या ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचे नियोजन असून सुरुवातीला तातडीने 10 मोठ्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील इमारतींची दुरुस्ती व नुतनीकरण करुन खासगी संस्थांना चालविण्याबाबत आवाहन करण्यात येईल.
            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अजित पवारसंजय कुटेआशिश शेलारजितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला होता.
००००
 

 
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत पुन्हा चौकशी करणार
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
            नागपूरदि. 21 : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत पुन्हा चौकशी सुरु करण्यात येईल व तीन महिन्यात अहवाल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईलअसे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
             श्री.देशमुख पुढे म्हणालेया बँकेने दिलेले कर्ज वसूल होत नसल्याने बँक अडचणीत आली आहे. कर्जमाफी नंतर बँकेची अडचण दूर होईल. सर्वच ठेवीदारांचे पैसे परत करता येत नसले तरी काही ठेवीदारांचे पैसे परत देण्याबाबत काही निर्बंध घातले आहेत त्यानुसारच ठेवीदारांचे पैसे परत देण्यात येतील. बँकेच्या गैरव्यवहाराबाबत यापूर्वीही चौकशी केली होती. आता नव्याने चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना ते म्हणालेबँक राज्यशिखर बँकेत विलिणीकरन करण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेमार्फत करण्यात येते.
            विधानसभा सदस्य सर्वश्री पंकज भोयरराजेश काशीवारचरण वाघमारेसमीर मेघेसमीर कुणावारसुधाकर कोहळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री.देशमुख बोलत होते.
००००

No comments:

Post a Comment