Tuesday, 2 January 2018

राज्य शासनाच्या केंद्राकडील पाठपुराव्याला यश उडीद आणि मूग खरेदीसाठी 12 जानेवारी पर्यंत मुदतवाढ


            मुंबई, दि. 2 : खरीप 2017 मधील उडीद व मूगाच्या वाढीवप्रमाणातील खरेदीसाठी राज्य शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार आता 12 जानेवारीपर्यंत दुसऱ्यांदा केंद्राने ही मुदतवाढ दिली आहे.
त्यानुसार आता उडीद आणि मुगाची आधारभूत किंमतीनुसार 12 जानेवारीपर्यंत खरेदी करता येईल. यासंदर्भात केंद्रीय कृषी विभागाकडून मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. शासनाने उडीद आणि मूग खरेदीसाठी मुदतवाढ मिळणेबाबत 21 डिसेंबर रोजी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र शासनाने उडिदाच्या वाढीव खरेदीसाठी 52 हजार मे.टनापर्यंत मंजुरी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेड एसएफसी आणि एफसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्याची प्रत पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनाही देण्यात आली आहे.

000

No comments:

Post a Comment