Tuesday, 2 January 2018

दिलखुलास कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट

 मुंबई, दि. २ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीच्या दिलखुलास  कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट यांची  अन्न व नागरी पुरवठा विभागाची वाटचालया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.  ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि. ३ जानेवारी आणि गुरुवार दि. ४ जानेवारी २०१७ रोजी सकाळी  ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  निवेदक मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे
           अन्न नागरी पुरवठा विभागाच्या कल्याणकारी योजनेची माहिती सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. या विभागाच्या योजना प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. त्यामुळे नागरिकांसाठी  राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती श्री. बापट यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

०००००

No comments:

Post a Comment