मुंबई, दि.4
- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय
महाराष्ट्र’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्यात 'डिजिटल
शाळा' हा उपक्रम राबविणारे श्री. हर्षल
विभांडीक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली
आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दि.5
जानेवारी रोजी सायंकाळी 7.30
या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत
वर्षा फडके- आंधळे यांनी घेतली
आहे.
न्यूर्याक येथे बँकीग क्षेत्रात कार्यरत असलेले
व मुळचे धुळे जिल्ह्यातील हर्षल विभांडीक यांना डिजिटल शाळा ही संकल्पना कशी सूचली,
या उपक्रमाच्या वाढीसाठी
त्यांनी केलेले प्रयत्न, धुळे
जिल्हा परिषदेच्या 1103 डिजिटल शाळेचा प्रवास, जिल्हा
परिषद धुळे, स्वयंसेवी संस्थाचा या कार्यक्रमातील सहभाग,
प्रेरणासभाच्या माध्यमातून लोकांचा मिळालेला प्रतिसाद,
जिल्हयातील सर्व शाळा डिजिटल झाल्यानंतर सौर शाळेकडे सुरू असलेली
वाटचाल याबाबत सविस्तर माहिती श्री.
विभांडीक यांनी ‘जय महाराष्ट्र’
या कार्यक्रमात दिली आहे.
0 0 0

No comments:
Post a Comment