मुंबई.दि.४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित'दिलखुलास 'कार्यक्रमात 'राज्याच्या
उद्योग वाढीस चालना' या विषयावर उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांची
मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार, दि. ५ जानेवारी
आणि शनिवार, दि. ६ जानेवारी
रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय जोग
यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील उद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना
देण्यासाठी 'मेक इन इंडिया ची संकल्पना, परवानामुक्त धोरण, विशाल प्रकल्प
धोरण,
महाराष्ट्र
इलेक्ट्रॉनिक्स धोरण, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना तसेच खनिज विकासाला चालना
देण्यासाठी घेण्यात आलेले शासनाचे धोरण, राज्याचे किरकोळ व्यापार धोरण आणि उद्योग
वाढीसाठी लागणा-या पायाभूत सुविधांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची सविस्तर
माहिती “दिलखुलास”कार्यक्रमातून
श्री. देसाई यांनी दिली आहे.
0 0 0

No comments:
Post a Comment