Tuesday, 9 January 2018

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन


नागपूरदि. 9 : जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे आज सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकरी उज्ज्वला तेलमासरे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुबोध देशपांडे, व्यापार प्रतिनिधी श्रीराम सातपुते, अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे सदस्य घनश्याम रहाटे, गणेश शिरोळे, गजानन पांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी  प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुबोध देशपांडे यासंबंधी माहिती देताना म्हणाले, शहरात चालणारे ऑटोरिक्षा मीटरने चालणे बंधनकारक करण्यात येणार आहे. डिसेंबर 2017 मध्ये 108 वाहनांची तपासणी झाली असून त्यापैकी 53 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच 24 वाहने अटकावून ठेवण्यात आलीत. त्यांच्याकडून 0.46 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 152 ऑटोरिक्षा चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. नागपुरातील मानसचौक, बैद्यनाथ चौक, भोले पेट्रोलपंप या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या अवैध वाहनांवर 112 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच ही संपूर्ण कारवाई 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
नागपुरातील हिवरी ले-आऊट, मानेवाडा, ओंकारनगर येथील रस्त्यांवर अवैध दुकाने लागलेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
*****

No comments:

Post a Comment