· प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम
नागपूर, दि.9 : सार्वजनिक रस्त्यांवर नागरिकांनी वाहनांच्या हॉर्नचा कमी वापर करावा तसेच लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्यावी याबाबत जनजागृती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गतप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांना ‘हॉर्न नको’ चे स्टीकर लावण्याची मोहीम सुरु केली आहे.
हरीत लवाद यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत निर्गमित आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यावर वापर होणाऱ्या वाहनांचे हॉर्न मोटार वाहन अधिनियम 1988 च्या तरतुदी नुसार लावण्यात आलेले नाही. ही बाब प्रादेशिकपरिवहन विभागाच्या लक्षात आली आहे.
शहरातील काही वाहन चालक विहीत केलेल्या नियमाचे पालन न करता कर्कश हॉर्नचा वापर करीत आहेत. ज्यामुळे लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे.वाहन धारकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘हॉर्न नको’ अशा प्रकारचे वाहनांवर स्टीकर्स लावण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी हॉर्न चा वापर करण्यात यावा तसेचकमी वापर करावा, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) शरद जिचकार यांनी केल्या आहेत.
नागपूर शहरातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस सहकार्य करीत हरीत लवाद यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व मोटार वाहन अधिनियम 1988 च्या तरतुदीनुसार वाहनांमध्ये हॉर्नबसविण्यात यावे तसेच हॉर्नचा कमी वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) शरद जिचकार यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment