Friday, 5 January 2018

मेजर हर्षल वासुदेव कचरे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबईदि. 5 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. पुण्याच्या आयसी 66275 एन मेजर हर्षल वासुदेव कचरे यांना   राज्य शासनामार्फत देण्यात येणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
एन मेजर हर्षल वासुदेव कचरे यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत 26 जानेवारी 2017 रोजी मेन्शन इन डिस्पॅच’ हे पदक प्रदान करण्यात आले आहे. मेजर हर्षल वासुदेव कचरे यांना  एकूण 2 लाख 75  हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.
यापैकी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजेनेअंतर्गत अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजेच 2 लाख 6 हजार 250 रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरीत 25 टक्के रक्कम म्हणजेच 68 हजार 750 रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहे. ही रक्कम पुण्याच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201712131627498207  असा आहे.
००००

No comments:

Post a Comment