Friday, 5 January 2018

आपले पोलीस, आपली अस्मिता लोकराज्यचा जानेवारी विशेषांक प्रकाशित

मुंबईदि. 5 : महाराष्ट्र पोलीस दलाच्या नेत्रदीपक कामगिरीचा आढावा घेणारा लोकराज्यचा  जानेवारी  महिन्याचा 'आपले पोलीसआपली अस्मिताहा विशेषांक प्रकाशित झाला आहे.
या अंकात फोर्स वननक्षलवाद्यांशी सामनामहामार्ग पोलीसदहशतवाद विरोधी पथकमुंबई पोलिसांचे शौर्यनागपूर तसेच पुणे पोलिसांची कामगिरीमुंबई लोहमार्ग पोलीसमुस्कान आणि शोध उपक्रमअवैध दारु निर्मितीवर प्रतिबंधआपत्ती प्रतिसाद दलगुन्हे सिद्धीचे शास्त्रीय तंत्रडिजिटल तपाससायबर युगाची आव्हानेसायबर क्राईम म्हणजे कायवाहनचालकांनी घ्यावयाची काळजीपोलिसांना उच्च शिक्षणाची संधीसायबर गुन्हांचा पाठलाग (सत्य कथा)सागरी सुरक्षा आदी विषयांवर मान्यवरांनी विस्तृत लेख  लिहिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकरगृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटीलअपर मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तवपोलीस महासंचालक सतीश माथूर यांचे विशेष लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. 76 पृष्ठांच्या या अंकाची किंमत फक्त 10 रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
००००

No comments:

Post a Comment