Monday, 8 January 2018

विभागीय लोकशाही दिनात एक तक्रार प्राप्त


        नागपूर, दि. 08 : उपायुक्त संजय धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 1 तक्रार स्वीकारण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा-1 अशा एका तक्रारीचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. यावेळी नवीन 3 प्रकरणात चर्चा झाली. तसेच जुन्या 2 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.
            या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, मुख्य वनसंरक्षक, नागपूर, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, जलसंपदा विभाग, उपसंचालक, हातमाग  यंत्रणा व वस्त्रालय, लेखा व कोषागरे, आदिवासी विभाग तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****

No comments:

Post a Comment