· 3 हजार 700 चालक वाहकांची तपासणी
नागपूर, दि. 7 : शहरातील स्कूल
बस तसेच वाहनांच्या चालक व वाहकांकरिता हैद्राबाद हाऊस
येथील मुख्यमंत्री कार्यालयात नि:शुल्क
नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील स्कूल बस तसेच
वाहनांच्या चालक व वाहकांकरिता नि:शुल्क नेत्र शिबिरामध्ये 1 हजार 844 स्कूल बसेस व वाहनांची नोंदणी
झालेली असून सुमारे 3 हजार
700 वाहक- चालकांना या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे. पहिल्याच दिवशी 200 स्कुल बस चालक व वाहकांनी नेत्र तपासणीसाठी नाव नोंदणी केली असून गरजूंवर
उपचार सुरु करण्यात आले आहे. नेत्र तपासणी सोबतच रक्त चाचणी, रक्तातील शर्करेचे
प्रमाण, रक्तदाब आदी ची तपासणी देखील करण्यात येत आहे.
नेत्र तपासणी शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अनुभवी नेत्र शल्य चिकित्सा
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असुन विविध तपासणीसाठी 14 डॉक्टर्स तसेच 50
सहाय्यक डॉक्टर्स कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री
सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे यांनी दिली.
नेत्र तपासणी शिबिर 11
फेब्रुवारीपर्यंत रविवारी तसेच दुसऱ्या शनिवारी सकाळी 10 वाजता
आयोजित करण्यात आले असून प्रत्येक रविवारी 450 ते
500 वाहक-चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. नेत्र तपासणी शिबिर
13 जानेवारी दुसरा
शनिवार, 14 जानेवारी , 21 व
28 जानेवारी रोजी
सकाळी 10 वाजता तसेच 10 व 11
फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपासून शिबिरात
वाहनचालक व वाहकांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या नेत्र तपासणीचा लाभ स्कूल
बस चालक व वाहकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री
कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. के.
आर. सोनपुरे यांनी केले आहे.
कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षणार्थी भारतीय सनदी अधिकारी डॉ. इंदु जाखड, वाहतुक
पोलिस उपायुक्त रविंद्रसिंह परदेशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.
अभिमन्यू निसवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निंबाळकर, प्रादेशिक परिवहन (शहर)
अधिकारी शरद जिचकार, पूर्व विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भोयर,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील औषधीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. वाय. व्ही.
बनसोड, वनस्पती व रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. स. म. सोनुने तसेच मुख्यमंत्री
कार्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment