मुंबई, दि. 3 :
महाराष्ट्र कला प्रदर्शन संचालनालयातर्फे दि. 6 मार्च ते 12 मार्च 2018 या
कालावधीत सर ज.जी. कला दालन, कला शाळा आवार येथे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनात
चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण
या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागवण्यात
आल्या आहेत. या प्रदर्शनात बक्षिसपात्र कलाकृतींना प्रत्येकी 10 हजार रुपयाचे एकूण
15 पारितोषिके देण्यात येणार आहेत.
इच्छूक
कलावंतांनी दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00 ते सायं 4.00 या
वेळेत सर ज.जी.कला संचालनालयात आपल्या कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन
प्रदर्शन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment