मुंबई, दि.3 माजी मंत्री ॲड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने विदर्भाचा अनुशेष पोरका झाला आहे,अशा शब्दात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, विदर्भाला मागासलेपणाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ॲड. मधुकरराव किंमतकर यांनी अखंड व अव्याहतपणे धडपड केली. विदर्भाचे अनुशेषाचे गाढे अभ्यासक अशी त्यांचीओळख होती. त्यांच्या निधनाने विशेषत: विदर्भाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावरुन नेहमी लढणाऱ्या एका सच्च्या नेत्यास आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मंत्री श्री. रावते यांनी ॲड. किंमतकर यांना आदरांजली वाहीली.
०००००
०००००
No comments:
Post a Comment