पुष्पस्पर्धांसाठी 22 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवा
नागपूर, दि.1 : उपवने व उद्याने विभागातर्फे गणतंत्र दिनी विधानभवनातील पुष्पप्रदर्शन हे नागपूरकरांचे मुख्य आकर्षण असून या वर्षीच्या पुष्प प्रदर्शनासाठी उद्यानस्पर्धेसह विविध प्रजातींच्या फुलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वार्षिक पुष्पप्रदर्शानासाठी ज्या प्रवेशिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उद्याने व उपवने विभागात उपलब्ध आहेत.
उद्याने व उपवने विभागाच्या 45 व्या वार्षिक पुष्पप्रदर्शनाचे आयोजन दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी विधानभवन येथे करण्यात आले असून पुष्पप्रदर्शनासोबत विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. पुष्पप्रदर्शनास भाग घेण्यासाठी प्रवेशिका 11 जानेवारीपासून जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उद्यानस्पर्धेसाठीच्या प्रवेशिका 17 जानेवारीपर्यंत भरण्याची अंतीम तारीख असून शुल्कासह प्रवेशिका 22 जानेवारीपर्यंत भरण्याची सुविधा आहे. प्रवेशिका सार्वजनिक बांधकाम विभाग संकूल येथील सहायक संचालक उपवने व उद्याने तसेच जुनेसचिवाल परिसरातील शासकीय रोपवाटीका येथेही प्रवेशिका उपलब्ध आहे. उद्यानप्रेमी नागरिकांनी पुष्प प्रदर्शन स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सहायक संचालक जे.व्ही, चौगुले यांनी केले आहे. स्पर्धेसाठी 0712-2561425 या दूरध्वनीवरील माहिती उपलब्ध आहे.
0000000
No comments:
Post a Comment