मुंबई, दि. 4 : ऋतू हिरवा, तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला, मेरा कुछ सामान' यासारखी मधुर गाणी संतूरच्या मंजुळ स्वरात श्रोत्यांना ऐकविणारे पंडित उल्हास बापट यांच्या निधनाने संगीतसृष्टीतला संतूरी स्वर कायमस्वरुपी निखळले अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जवळपास 15 वर्षे संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम केलेल्या पंडित बापट यांनी क्रोमॅटिक पद्धतीने संतूर वादन करुन शास्त्रीय संगीतात अमूल्य योगदान दिले. 'माझ्या बाहुलीचं लगीन', 'हलकेच सोनुलीचा पाळणा गं हलवा' या गीतांची रचना करणारे आणि मराठी बरोबरच हिंदी संगीत सृष्टीवर आपल्या संतूरवादनाचा ठसा उमटवणारे पं. उल्हास बापट यांनी संतूरवादनाला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवले. अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण असते हे पंडित बापट यांचे संतूर वादन ऐकले की पटते असेही श्री. तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
००००
No comments:
Post a Comment