नागपूर, दि. 4 : विभागीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 8 जानेवारी,
2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार हे जनतेच्या तक्रारी
व गाऱ्हाणी ऐकतील.
तक्रारकर्त्यांनी
जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी 11 ते 1
वाजेपर्यंत स्वत: उपस्थित रहावे.
*****
No comments:
Post a Comment