Saturday, 3 February 2018

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 4 लाख 92 हजार रुपये किंमतीचा दारु साठा जप्त


नागपूर, दि. 3 :सावनेरच्या राज्य उत्पादन शुल्क, ई-1 विभागाने छिंदवाडा-सावनेर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली मध्यप्रदेश निर्मित विदेशी दारुची वाहतूक करणारी कार पकडून 4 लाख 92 हजार किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईतॅकडॉवेल नं 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या एकूण 5 पेटया, आणि ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 180 मि.लि. क्षमतेच्या एकूण 20 पेटया होंडा सिटी कार क्र. MH-01-VA-1039  मध्ये आढळून आल्यात. असा एकूण 4 लाख 92 हजार किमंतीच्या मुद्देमालासह वाहन चालक सुभाष गंगाराम कोकुलवार (वय 45 वर्ष) विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली.
ही कारवाई उपायुक्त श्रीमती उषा वर्मा, अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे, मिलिंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक उमेश सोनोने, रमेश कांबळे, वाहन चालक उद्धव माळी,श्री मिर्झा यांनी सहकार्य केले

****

No comments:

Post a Comment