मुंबई,
दि. 5 :राज्यातील 1 लाख 2 हजार 881 शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन संचाच्या अनुदानापोटी 255 कोटी
रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी
माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
विधानसभा सदस्य सर्वश्री संजय सावकारे, जयंत
पाटील,
शशिकांत शिंदे, राजेश टोपे, श्रीमती प्रणिती शिंदे आदींनी राज्यातील सुक्ष्म सिंचन संचाचे अनुदान वितरीत
करण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात कृषीमंत्री यांनी
सांगितले,
1 लाख 97 हजार 629
शेतकऱ्यांनी अनुदानाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी 1 लाख 23 हजार 525 शेतकऱ्यांचे स्थळ तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 2 हजार 881 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित
शेतकऱ्यांची स्थळ तपासणी करुन अनुदान देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे
श्री.फुंडकर यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
000
No comments:
Post a Comment