मुंबई,
दि. 5 :राज्यात आवश्यक तेथे टँकरद्वारे
पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सध्या 257 गावांना 238 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नाच्या
लेखी उत्तरात दिली आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत विधानसभेचे
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, भास्कर जाधव, सुनील केदार, अब्दुल सत्तार आदींनी लेखी
प्रश्न विचारला होता. त्याला लेखी उत्तर देताना श्री. पाटील यांनी सांगितले, सन 2017 मधील खरीप हंगामात 14 हजार 679
गावांमध्ये अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे.
केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेमधील निकषानुसार या गावांमध्ये दुष्काळ
जाहीर करण्यात आला नाही.
मराठवाड्यात यावर्षी सरासरी 72.90 टक्के पाऊस झाला आहे. खरीप हंगामात 3577
गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे.
औरंगाबाद विभागात 111 गावे व 3
वाड्यांना 138 टँकरद्वारे पाणी पुवरठा केला जात आहे. विदर्भातील 9799
गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे.
केंद्र शासनाच्या दुष्काळ संहिता 2016 च्या निकषाबाबत राज्य शासनाचे
अभिप्राय कळविण्यात आले आहे. सध्या 238 टँकरद्वारे 257 गावे व 4 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
000
No comments:
Post a Comment