Sunday, 4 March 2018

रांजणगाव (पोळ) येथे 262 कोटी रुपयांच्या गाळ काढण्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


            औरंगाबाद,दि. 04 (जिमाका) - गंगापूर तालुक्यातील रांजणगाव (पोळ) येथील लघु सिंचन प्रकल्पातील बजाज ॲटो लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) व लोकवर्गणीतून 262 कोटी रुपयांच्या गाळ काढण्याच्याकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला
            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, आमदार अतुल सावे,  बजाज ॲटो लिमिटेडचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास ट्रस्टचे चेअरमन चंद्रकांत त्रिपाठी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, एकनाथ जाधव, शिरीष बोराळकर, गावच्या सरपंच राणी विलास प्रधान, उपसरपंच दत्तू रावसाहेब कुऱ्हाडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पाताई जाधव,  ग्रामपंचायतीचे सदस्य भागिनाथ रोकडे, शिवाजी पाटील बोडखे आदींची उपस्थिती होती.
            बजाज ॲटो लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून तसेच लोकवर्गणीतून गंगापूर तालुक्यातील 110 गावातील सुमारे 1 लाख 50 हजार एकर तलावाअतर्गत असलेल्याजमिनीतील गाळ काढण्यात येणार आहे. याचा लाभ परिसरातील 1 लाख 44 हजार 657 ग्रामस्थांना होणार आहे. हे काम 11 पोकलॅन मशिन, दोन जेसीबी मशिन तसेच 51 वाहनांच्या (टिप्पर) सहाय्याने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना बजाज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीदिली.
*******




No comments:

Post a Comment