मुंबई, दि. 26 : राज्यातील
शेतकऱ्यांकडुन आधारभूत किंमत दराने खरेदी केलेल्या तुरीच्या एकूण रकमेपैकी सुमारे
200 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा
करण्यात येणार आसून उर्वरित रक्कम नाफेड कडून घेऊन टप्प्या टप्याने देण्यात येईल
असे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला
सांगितले.
श्री. खोत पुढे म्हणाले, राज्यात एकूण 189 तूर खरेदी केंद्रे उघडण्यात आली होती.
यासर्व केंद्रांवरून हमिभावाने आत्तापर्यंत सुमारे 800 कोटी रुपयांची तूर खरेदी
झाली आहे. गेल्या वर्षीचे पैसे देणे शिल्लक राहिले नसून, यावर्षीची रक्कमही लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. ही खरेदी
एप्रिल 2018 पर्यंत चालू राहणार आहे.
सदस्य सर्वश्री हेमंत टकले, हरिभाऊ राठोड, जयवंतराव
जाधव, अमरसिंह पंडित, ख्वाजा बेग आदिंनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
००००
No comments:
Post a Comment