Wednesday, 28 March 2018

भामा आसखेड प्रकल्पाचे कामलवकर सुरू करणार -विजय शिवतारे


मुंबई, दि.28: दौंड तालुक्यातील भामा आसखेड प्रकल्पाचे कामसुरु करण्याबाबत बैठक घेऊन काम मार्गी लावू, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
यासंदर्भात सदस्य राहूल कुल यांनी  विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती यावर उत्तर देताना श्री.शिवतारे म्हणाले, पुणे शहराची वाढती लोकसंख्या व शहराला लागणारे वाढीव पाणी याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल.
भामा आसखेड प्रकल्पाच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार भामा आसखेड प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र 23 हजार 110 हेक्टर आहे. या प्रकल्पाच्या 188.611 दलघमी पाणी वापरापैकी 141.486 दलघमी पाणी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण व लगतच्या 19 गावांना पिण्याचे पाणी वापरासाठी शासनाकडून वेळोवेळी आरक्षित केले आहे. यासाठी पाईपलाईनची सुविधा केली असून याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 137 कोटींचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने शासनाला पाठवावा यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
याचर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, राहूल कुल यांनी सहभाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment