मुंबई,दि.28 : बुलढाणा शहरासाठीसोयी सुविधा, पाणीटंचाई, पाणी
वितरण व्यवस्था याबाबत एकत्रित आराखडा
तयार करुन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री
डॉ.रणजीत पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात सदस्य हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली
होती. त्यावेळी ते बोलत होते.श्री. पाटील म्हणाले,बुलढाणा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व इतर सोयीसुविधा बाबत नियोजनाचा अभाव आहे.
पाण्याच्या प्रश्नाबाबत तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आलेला निधी वेळेवर खर्च झालेला नाही.
खडक-पूर्णा प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून पुढील कामे सुरू करण्याबाबत
मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, राहूल बोंद्रे यांनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment