Tuesday, 27 March 2018

जिल्हा तांत्रिक सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट ‘अ’मध्ये समायोजन करण्याबाबत तीन महिन्यात निर्णय घेण्यात येईल - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई, दि. 27 : जिल्हा परिषदेकडील जिल्हा तांत्रिक संवर्ग गट मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट दर्जा देण्यात आला असून गट मध्ये समायोजन करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतीत तीन महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
डॉ. सावंत म्हणाले, गट च्या अधिकाऱ्यांना गट चा ग्रेड पे देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यातील तांत्रिक बाबी तपासून घेण्यासाठी तांत्रिक समितीच्या मान्यतेने निर्णय घेण्यात येईल. सन 1986 पासून या बाबत प्रश्न उपस्थित झालेला आहे. फिरत्या पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गटात नेमणूक होते. एकूण मंजूर पदांपैकी 33 टक्के पदे ही बीएएमएस केलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना घेता येते. सन 2016मध्ये वैद्यकीय अधिकारी न्यायालयात गेल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, असेही ते म्हणाले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य जयवंतराव जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment