Tuesday, 27 March 2018

बीड तालुक्यातील शिवणी सिंचन प्रकल्प आणि जरुड सिंचन जोड प्रकल्प करण्याबाबत सहा महिन्यात निर्णय घेणार - जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे


मुंबई, दि. 27 : बीड तालुक्यातील शिवणी प्रकल्पातील पाणी 4 गावांना व जरुड प्रकल्पातील पाणी 4 गावांना कालव्याद्वारे शेतजमिनींना देण्यात येते. मात्र या प्रकल्पातील पाण्याची आवक आणि वापराशिवाय वाहून जाणारे पाणी लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प जोडून घेण्यात यावे यासाठीची व्यवहार्यता तपासून घेऊन सहा महिन्यात निर्णय घेण्यात येईल,असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य अमरसिंह पंडीत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment