Tuesday, 27 March 2018

दमणगंगा –पिंजाळ नदीजोड प्रकल्प शेतकऱ्यांच्या सहमतीनेच करणार -जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

मुंबई, दि. 27; दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीनेच होईल असे जलसंपदा राज्यमंत्री  विजय शिवतारे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. शिवतारे म्हणाले, या प्रकल्पासाठी सुमारे 1558 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार असून या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरु झालेली नाही.
राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने तयार केलेल्या अहवालानुसार दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पांतर्गत दमणगंगा नदीवर 426.39 द.ल.घ.मी. क्षमतेचे भूगड धरण व वाघ  नदीवर 460.79 क्षमतेचे  खारगिहील धरण बांधण्यात येणार असून 100 टक्के विश्वासार्हचे अनुक्रमे 210 द.ल.घ.मी. व 369 द.ल.घ.मी. असे एकुण 579 द.ल.घ.मी. पाणी मुंबई शहरास पिण्यासाठी पुरविण्याचे प्रस्तावित आहे. तर दमणगंगा खोऱ्यातील सिंचनासह स्थानिक वापरासाठी 3213.90 द.ल.घ.मी. पाणी वापर नियोजित आहे असे, जलसंपदामंत्री यांनी या विषयावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री आनंद ठाकूर, रवींद्र पाठक यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment