Monday, 26 March 2018

साखर कारखान्यांमध्ये उसाच्या वजन काटा तपासणीसाठी राज्यात सर्वत्र भरारी पथके कार्यान्वित -सहकार मंत्री सुभाष देशमुख


मुंबई, दि.26:राज्यातील साखर कारखान्यांमधील उसाच्या वजन काट्याच्या तपासणी साठी सर्वत्र भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आली असून आतापर्यंत 187 कारखान्यांपैकी 185 कारखान्यांची अचानक तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
            श्री. देशमुख पुढे म्हणाले, भरारी पथकाने केलेल्या तपासणीत कोणतीही त्रुटी आढळली नाही. या भरारी पथकांना महिन्यातून एकदा अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
            उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment