नागपूर, दि. 23 : महात्मा गांधी
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनीकरण तसेच वन विभागामार्फत घेण्यात
येणाऱ्या रोपवाटिका, रोपवन, मृद जलसंधारण इत्यादी कामांतर्गत हजेरीपत्रके निर्गमित
करणे, भरणे, पारित करणे आणि कुशल / अकुशल बाबींचे भूगतान करण्याचे अधिकार वन
विभागाला 31 मार्च 2018 पर्यत देण्यात आले होते.
सदर मुदतवाढीचा शासन निर्णय जारी झाला असून या शासन निर्णयानुसार ही मुदतवाढ
31 मार्च 2020 असणार आहे.
यासंदर्भातील
मार्गदर्शक सूचना सप्टेंबर 2016 मध्ये निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसारच
राहतील, असे रोजगार हमी आयुक्तालयाने कळविले आहे.
अधिक माहिती
महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
No comments:
Post a Comment