Tuesday, 29 May 2018

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांत आता 35 रुपये किलो दराने तूरडाळ

राज्यातील ग्राहकांच्या हितासाठी स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीच्या प्रति किलो 55 रुपयांच्या दरात सुधारणा करण्यात आली असून आता प्रति किलो 35 रुपयांप्रमाणे विक्री करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तूरडाळीचा पुरवठा अनुक्रमे 38 रुपये आणि 30 रुपये प्रति किलो याप्रमाणे केला जातो. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत कमीत कमी किंमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाचे सार्वजनिक उपक्रमस्थानिक स्वराज्य संस्थापूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आली आहे.

-----000-----

No comments:

Post a Comment