Sunday, 27 May 2018

दिलखुलास कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक

     मुंबईदि.27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात  अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत सोमवार दि. 28 आणि मंगळवार दि. 29 मे 2018 रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी  7.25 ते7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नवीन  99 लाख शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य घेता येणार असून यामागची भूमिकासार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केलेल्या डिजिटायजेशनमुळे राज्यात डिजिटल झालेल्या शिधापत्रिकानवीन पात्र लाभार्थ्यांची निवडशिधापत्रिकेबरोबर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक सिडिंग करण्यामागची भूमिकाराज्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये वापरण्यात  येणारे पॅाईंट ऑफ सेल हे उपकरणराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आदी  माहिती श्री. पाठक यांनी  दिलखुलास  कार्यक्रमातून  दिली आहे.

No comments:

Post a Comment