मुंबई दि. 28 - लोकसभा पोटनिवडणूकीदरम्यान 22- पालघर आणि 11- भंडारा-गोंदीया येथे काही ठिकाणी मतदान यंत्रे (ईव्हीएम्स)
आणि व्हीव्हीपीटीएस यंत्रे काही तांत्रिकी कारणामुळे नादुरूस्त झाली होती.
नादुरुस्त यंत्रे बदलण्यात आली असून शांततापुर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू
आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य
निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
काही वेळा तांत्रिकी कारणांमुळे यंत्रे नादुरूस्त
होण्याच्या समस्या उद्भवतात. अशी यंत्रे बदलण्यासाठी राखीव यंत्रांचीही तरतूद
करण्यात आलेली असते. पालघर आणि भंडारा, गोंदिया येथे पेाटनिवडणुकीच्या मतदानावेळी ईव्हीएम यंत्रे
नादुरूस्त झाल्यामुळे ही यंत्रे शिष्टाचाराप्रमाणे
बदलण्यात आली आहेत, असे
प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
०००
No comments:
Post a Comment